Ad will apear here
Next
मोर्शी येथे पंकजा मुंडे यांचा सत्कार
मोर्शी (अमरावती) : मोर्शी पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी ग्रामविकास विभागामार्फत निधी मंजूर केल्याबद्दल तालुक्याच्या वतीने पंकजा मुंडे यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. 
या कार्यक्रमासाठी पालकमंत्री प्रविण पोटे पाटील, खासदार रामदास तडस, आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार डॉ. अनिल बोडे, जिल्हाध्यक्ष दिनेश सुर्यवंशी यांच्यासह जिल्हा परिषदेचे विषय समितीचे सभापती, पंचायत समितीचे सभापती व पंचक्रोशीतील ग्राम पंचायतींचे सरपंच उपस्थित होते.

राज्याच्या ग्रामीण भागात दर्जेदार व टिकावू रस्ते बांधण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत सात हजार सहाशे किलोमीटर रस्त्यांच्या कामांना प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे. जलयुक्त शिवार अभियान गावागावात राबविण्यात आल्यामुळे विदर्भात विक्रमी तुरीचे पीक आले. बचतगटांची चळवळ गतिमान करण्यासाठी, ‘सुमतीबाई सुकळीकर उद्योगिनी महिला सक्षमीकरण योजने’तून महिला बचतगटांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज देण्याची योजना सुरू करण्यात आली आहे. बचतगटांची उत्पादने लोकांना ऑनलाईन उपलब्ध व्हावीत यासाठी वेबपोर्टलही सुरू करण्यात आले आहे.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/DZWUBG
Similar Posts
शेतकरी उभे करणार बिगरराजकीय आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रकाश पोहोरे, विजय जावंधिया, देवेंद्र शर्मा यांनी जेलभरो आंदोलन करायचे ठरविले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हेतूने हे बिगरराजकीय आंदोलन उभे करण्यात आले आहे. ‘बिगरराजकीय आंदोलन उभे झाले, तर सरकारदेखील सहानुभूतीने विचार करू शकते. शेतकऱ्यांनी
कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे मोर्शी (अमरावती) : मोर्शी येथील खुले कारागृह येथे भारतीय महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकाच्या वतीने कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला. खुले कारागृह स्थापन झाल्यापासून म्हणजे २००८ पासून सतत १० व्या वर्षीही या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कारागृहात बंदी
भारतीय महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी कैद्यांना बांधल्या राख्या मोर्शी (अमरावती) : भारतीय महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना पथकातर्फे येथील खुल्या कारागृहातील कैद्यांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे करण्यात आले. खुले कारागृह स्थापन झाल्यापासून २००८पासून सलग १०व्या वर्षी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हातून गुन्हा घडल्याने घरापासून, समाजापासून दूर
पोटे, आंबटकर, धस यांचे अर्ज दाखल मुंबई : विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून अमरावतीमध्ये उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे-पाटील, वर्धा–चंद्रपूर–गडचिरोली मतदारसंघात प्रदेश सरचिटणीस डॉ. रामदास आंबटकर व बीड–लातूर–उस्मानाबाद मतदारसंघात माजी मंत्री सुरेश धस यांनी अर्ज दाखल केले

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language